तृतीयपंथीच्या समावेशनासाठी प्रत्येक व्यक्तीने सामाजिक पुढाकार घ्यावा – विशाल पिंजानी

0
52

प्रतिनिधी : जानवी घोगळे

महावीर महाविद्यालयात लिंगभाव, समाज आणि अर्थव्यवस्था : भारतातील समावेशी विकास मार्ग या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न

कोल्हापूर : येथील महावीर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘लिंगाभाव, समाज आणि अर्थव्यवस्था : भारतातील समावेशक विकासाचा मार्ग ‘ या विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. समाजातील लिंगभेदाची समस्या ही खूप जटिल आहे, यामध्ये स्त्रियांना अजून ही दुय्यम स्थान आहे अशा परिस्थितीत समाजातील तृतीयपंथी घटक तर सामाजिक परिघाच्या बाहेर आहेत त्यामुळे या समुदायाचा कोणताही विकास झालेला नाही. समाजातील सर्वसामान्य लोकानी या समुदायाकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहावे व त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत करावी असे प्रतिपादन श्री.विशाल पिंजानी यांनी केले.या राष्ट्रीय चर्चासत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून म्हणून उपस्थित होते. कर्नाटक विद्यापीठ धारवाड येथील प्रोफेसर डॉ. जयश्री एस यांनी या चर्चासत्रामध्ये आपल्या बीजभाषणात प्रतिपादित केले की ‘ समाजाचा आर्थिक व सामाजिक विकास महिला, पुरुष व इतर लैंगिक घटक यांच्यात समन्वय होऊन त्यांना समान विकासाच्या संधी मिळतील तेव्हा होईल’ डॉ. सुषमा रोटे यांनी त्यांच्या अध्यक्षीय मनोगता मध्ये ‘ देशाच्या प्रगती मध्ये स्त्रियांचा वाटा मोठा आहे, संस्कारी समाज घडवण्याचे कार्य स्त्रिया करतात’ असे प्रतिपादित केले.

दुसऱ्या सत्रामध्ये बेळगाव येथील डॉ. विनोद मगदूम यांनी सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक धोरण या विषयावर मांडणी केली. या राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ.महादेव देशमुख, प्रा.अरविंद घोडके, प्राचार्य डॉ.अद्वैत जोशी यांनी ही विविध सत्रात अध्यक्षीय मार्गदर्शन केले. या राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्रासह देशभरातील दिल्ली, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, केरळ येथील प्राध्यापक, संशोधक, लेखक, विद्यार्थी यांनी भारतीय समाजकारण, अर्थकारण, लिंगभाव व विकासाची दिशा या अंतर्गत विविध विषयावर १५० पेक्षा जास्त शोधनिबंध सादर केले.
या कार्यशाळेचे आयोजन अँड. के. ए कापसे, अँड. अभिजीत कापसे, मा. मोहन गरगटे, प्राचार्य डॉ. अद्वैत जोशी, डॉ.प्रतिमा पवार, डॉ. एम. एस देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अंकुश गोंडगे, डॉ.सुजाता पाटील, डॉ. संजय ओमासे,प्रा. स्नेहल घोरपडे, डॉ.संदीप पाटील, प्रा. मानसिंग पाटील, प्रा.सखाराम हुंबे, प्रा.उमेश वांगदरे यांनी केले यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गोमटेश्वर पाटील यांच्यासह महावीर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील १५० पेक्षा जास्त प्राध्यापक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here