जिओब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर्सची वेबसाइट लॉन्च; गुंतवणूक सल्ला व्यवसायाच्या व्यावसायिक प्रारंभाची तयारी वेगात

0
17

प्रतिनिधी : जानवी घोगळे

  • अर्ली अ‍ॅक्सेस कॅम्पेनची सुरुवात, गुंतवणूकदारांना आगामी उत्पादनांच्या अपडेटसाठी नोंदणीची संधी
  • ब्लॅकरॉकच्या Aladdin तंत्रज्ञानासोबत जिओच्या डिजिटल क्षमतेचा वापर
  • गुंतवणूक सल्ला अधिक स्वस्त, सोपा आणि वैयक्तिक करण्यावर भर

मुंबई, 12 जानेवारी 2026: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि जागतिक गुंतवणूक कंपनी ब्लॅकरॉक यांचा 50:50 संयुक्त उपक्रम असलेल्या JioBlackRock Investment Advisers ने आपली अधिकृत वेबसाइट www.jioblackrock.com लॉन्च केली आहे. यासोबतच कंपनीने विशेष अर्ली अ‍ॅक्सेस कॅम्पेनलाही सुरुवात केली असून, याअंतर्गत गुंतवणूकदारांना आगामी उत्पादने व लॉन्चबाबत माहिती मिळवण्यासाठी आधीच नोंदणी करता येणार आहे.

ही नवीन वेबसाइट जिओब्लॅकरॉकच्या गुंतवणूक सल्ला व्यवसायाच्या पूर्ण व्यावसायिक प्रारंभाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. याआधी कंपनीच्या अ‍ॅसेट मॅनेजमेंट युनिटने यावर्षी 10 गुंतवणूक उत्पादने बाजारात आणली असून, त्यांना गुंतवणूकदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

ब्लॅकरॉकची जागतिक गुंतवणूक तज्ज्ञता आणि अत्याधुनिक Aladdin तंत्रज्ञान जिओच्या मजबूत डिजिटल प्लॅटफॉर्मसोबत एकत्र करून, भारतातील गुंतवणूकदारांसाठी किफायतशीर आणि वैयक्तिकृत गुंतवणूक सल्ला उपलब्ध करून देण्यावर कंपनीचा भर आहे. याशिवाय, कंपनीने LinkedIn, Instagram, Facebook, YouTube आणि X (पूर्वीचे Twitter) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही आपली उपस्थिती नोंदवली आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेजचे सीईओ हितेश सेठिया यांनी सांगितले की, अ‍ॅसेट मॅनेजमेंट व्यवसायाला मिळालेल्या यशानंतर गुंतवणूक सल्ला सेवेचा प्रारंभ हा जिओब्लॅकरॉकच्या एकात्मिक गुंतवणूक धोरणाचा महत्त्वाचा भाग असून, भारतातील लोकांना जागतिक दर्जाच्या गुंतवणूक उपायांपर्यंत पोहोच देणे हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.

ब्लॅकरॉकच्या इंटरनॅशनल हेड रेचल लॉर्ड यांनी सांगितले की, ही पुढाकार योजना लाखो भारतीयांसाठी वैयक्तिक गुंतवणूक सल्ला अधिक सोपा आणि परवडणारा बनवेल, ज्यामुळे ते आपल्या भविष्यासाठी अधिक सक्षमपणे गुंतवणूक करू शकतील.

दरम्यान, JioBlackRock Investment Advisers चे सीईओ मार्क पिलग्रेम यांनी सांगितले की, कंपनीची डिजिटल-फर्स्ट गुंतवणूक सल्ला सेवा भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी संस्थात्मक स्तरावरील गुंतवणूक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकसित केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here