
प्रतिनिधी :रोहित डवरी
जिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बहुप्रतिक्षेत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा मंगळवारी, 13 जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने, दुपारी 4.00 वाजता पत्रकार परिषद बोलाविली आहे. यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार आहे. सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्केपर्यंत आहे, अशा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत.

