
कोतोली प्रतिनिधी :पांडुरंग फिरंगे
आजच्या जागतिक युगात हिंदी भाषेला विश्वस्तरावर तिसऱ्या क्रमांकाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. युवा पिढी यांत्रिकी व तांत्रिक व्यवहारांमध्ये इंग्रजीसोबतच अधिकाधिक हिंदीचा वापर करताना दिसत आहे. त्यामुळे हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी केले.
श्रीपतराव चौगुले आर्टस् अॅण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी–कोतोली येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विश्व हिंदी दिनानिमित्त आयोजित भित्तीपत्रक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. रावण होते. प्रमुख उपस्थिती म्हणून अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे सहसमन्वयक डॉ. एस. एस. कुरलीकर, स्टाफ सेक्रेटरी डॉ. यू. एन. लाड, प्रा. रुपाली पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतनकुमार पाटील यांनी केले. स्वागत प्रियांका पाटील हिने केले, तर हिंदी विभागप्रमुख डॉ. वंदना पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ :
श्रीपतराव चौगुले कॉलेजमध्ये भित्तीपत्रकाचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील व प्रा. डॉ. बी. एन. रावण यांच्यासमवेत डॉ. वंदना पाटील, डॉ. एस. एस. कुरलीकर, प्रा. रुपाली पाटील.

