युवा पिढीचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद आणि स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाबाई यांची जयंती साजरी

0
31

प्रतिनिधी : जानवी घोगळे

स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती १२ जानेवारी रोजी सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्वेंशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन, कोल्हापूर येथे उत्साहात साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरी केली जाते. कार्यक्रमाची सुरुवात स.प्रा.ऋतिका चांदवानी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनीच कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. आर. व्ही. गुरव, विभागप्रमुख, वनस्पतीशास्त्र विभाग व अधिष्ठाता, विज्ञान शाखा, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर तसेच प्राचार्य प्रा. डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांनीही प्रतिमांना अभिवादन केले.

अन्नतंत्रज्ञान विभागातील पीजीडीएनडी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या पोस्टर सादरीकरणाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात पाच गटांनी सहभाग घेतला. बी.एस्सी. (एफटीएम) द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी कु. तनया पाटणकर यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. डॉ. आर. व्ही. गुरव यांनी आपल्या प्रमुख व्याख्यानात भारताचे कृषी व भौगोलिक महत्त्व अधोरेखित केले तसेच शेती आणि आयात-निर्यात क्षेत्रातील वाढ राष्ट्रीय विकासासाठी कशी महत्त्वाची आहे हे स्पष्ट केले. त्यांनी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या योगदानावरही मौलिक विचार मांडले. प्राचार्य प्रा. डॉ. आर. जी. कुलकर्णी यांनी आजच्या तरुणांनी या महान व्यक्तिमत्त्वांकडून प्रेरणा घेऊन जीवनात पुढे वाटचाल करावी, असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक स.प्रा.श्वेता पाटील, स्टाफ सेक्रेटरी स. प्रा. प्रीती गरगटे गारगटे (विभागप्रमुख, इंटीरियर डिझाईन), डॉ. नीलम जिराजे (विभागप्रमुख, अन्नतंत्रज्ञान), स. प्रा. प्रज्ञा कापडी (विभागप्रमुख, फॅशन डिझाईन), श्री. एस. एस. गड्डी (कार्यालय अधीक्षक), प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप स.प्रा. प्रियांका चव्हाण (विभागप्रमुख, पर्यावरणशास्त्र) यांच्या आभारप्रदर्शनाने झाला. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. हा कार्यक्रम प्राचार्य प्रा. डॉ. आर. जी. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व दिनविशेष समितीच्या समन्वयक अनुराधा कुंभार यांच्या समन्वयाने पार पडला. या कार्यक्रमास सायबर संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्थ डॉ. आर.ए. शिंदे व सचिव सीए एच आर शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here