
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन कार्यक्रम राबविण्यात येतो. तथापि राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम आयोजित केला असून 16 जानेवारी ते 7 फेब्रुवारी पर्यंत आचारसंहिता लागू असल्याने 2 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

