
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 20 (जिमाका) : सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यामार्फत जिल्ह्यातील माजी सैनिक व्याख्येत न येणारे तसेच सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या 65 वर्ष वयावरील सैनिकांचा तपशील 31 जानेवारीपर्यंत मागविण्यात आला आहे. जिल्ह्यातील माजी सैनिकांनी, विधवांनी आपली नावे योग्यतेप्रमाणे व नमुद माहितीप्रमाणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाचा ईमेल zswo_kolhapur@maharashtra.gov.in व 9172035612 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त) ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार यांनी केले आहे.
आर्मी नंबर, रँक व नाव, भरतीची तारीख, सैन्यदलांतून सेवानिवृतिची तारीख, निवृत्तीचे कारण, पत्ता (गाव व तालुका), मोबाईल क्रमांक, युद्धात सहभाग असल्यास तपशील आदी माहिती सादर करावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क करावा.

