जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकांसाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती

0
26

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. २० (जिमाका) : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, राधानगरी, करवीर व गगनबावडा या तालुक्यांसाठी श्रीमती याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच शाहुवाडी, हातकणंगले, शिरोळ व पन्हाळा या तालुक्यांसाठी संतोष भोर, सह आयुक्त (भूसंपादन/करमणूक), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चंदगड, गडहिंग्लज, आजरा व भुदरगड या तालुक्यांसाठी नंदकुमार कोष्टी, सह आयुक्त (पुनर्वसन), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त यांनी दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here