कोल्हापूर महानगरपालिकेत महापौरपदासाठी विजय उर्फ रिंकू देसाई यांचे नाव आघाडीवर

0
27

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर : नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ मधून सर्वाधिक मताधिक्याने विजयी ठरलेले भाजपचे उमेदवार विजय उर्फ रिंकू देसाई यांचे नाव आता महापौर पदासाठी जोरदार चर्चेत आले आहे. शहरातील राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून भाजपच्या गोटातही त्यांना महापौरपदासाठी प्राधान्य दिले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे महापौर पद ओबीसी आरक्षण असल्यामुळे सामाजिक समतोल, जनाधार आणि कामाचा अनुभव या सर्व बाबींचा विचार करता विजय देसाई हे महापौरपदासाठी सक्षम व मजबूत दावेदार मानले जात आहेत. प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांनी मिळवलेले विक्रमी मताधिक्य हे त्यांच्या लोकप्रियतेचे व जनतेतील विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.

विजय उर्फ रिंकू देसाई यांनी निवडणुकीदरम्यान विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकाभिमुख धोरणे यांवर भर दिला होता. त्यांच्या प्रचाराला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरघोस मतदान केले. त्यामुळेच ते केवळ नगरसेवक म्हणून नव्हे तर शहराच्या नेतृत्वासाठीही सक्षम पर्याय म्हणून पुढे येत आहेत.

भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून तसेच महायुतीतील पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या नावाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे समजते. शहरातील विविध सामाजिक घटकांमध्येही त्यांच्या उमेदवारीबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी विजय उर्फ रिंकू देसाई यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा असून, त्यांची महापौरपदासाठीची दावेदारी अधिक बळकट होताना दिसत आहे. आता भाजपच्या अधिकृत निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here