
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघात आज जनसुराज्य पक्षाच्या वतीने जोरदार प्रचाराला सुरुवात झाली. पक्षाचे युवा नेते ज्योतिरादित्य कोरे यांनी जिल्हा परिषद उमेदवार संगिता शंकर पाटील तसेच पंचायत समिती उमेदवार युवराज चौगुले यांच्या प्रचारासाठी बाजार भोगावं पंचायत समिती मतदारसंघात सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत अखंडपणे गाव-टू-गाव दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला.

या प्रचार दौऱ्यात कोरे यांनी प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन मतदारांची भेट घेतली. जनतेच्या अडचणी, प्रश्न व अपेक्षा जाणून घेत जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून झालेली विकासकामे आणि आगामी काळातील विकासाचा आराखडा सविस्तरपणे मांडण्यात आला. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेतकरी प्रश्न, तरुणांसाठी रोजगाराच्या संधी तसेच महिलांसाठी सक्षम योजनांबाबत ठोस भूमिका मांडत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ज्योतिरादित्य कोरे यांनी केले.यावेळी गावातील तरुण, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात कोरे यांचे आणि उमेदवारांचे स्वागत केले. अनेक ठिकाणी नागरिकांनी आपली मते मांडत उमेदवारांप्रती विश्वास व्यक्त केला. “जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडलेला पक्ष म्हणून जनसुराज्य पक्ष काम करत असून, विकासासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक आहे,” असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.या प्रचारात जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, स्थानिक नेते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या प्रचारामुळे बाजार भोगावं पंचायत समिती मतदारसंघात जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.


