
कोतोली (प्रतिनिधी) – पांडुरंग फिरींगे
कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघात आज शिंदे सेनेच्या जिल्हा परिषद उमेदवार वर्षाराणी अरुण पाटील व पंचायत समिती उमेदवार आण्णासाहेब बाळकू गायकवाड यांच्या सौभाग्यवती सोनाली गायकवाड यांनी मतदारसंघात हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला.
मतदारसंघातील मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांनी “कोतोली मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठीच आम्ही रिंगणात उतरलो असून आम्हाला विजयी करण्याचे आवाहन” केले.
आज कोतोली परिसरात घराघरांत जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेण्यात आला. ऐन कामाच्या घाईगडबडीतही मतदारांनी उमेदवारांना चांगला प्रतिसाद दिला. या प्रचारादरम्यान महिलांची लक्षणीय व मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.

यावेळी सोनाली आण्णासाहेब गायकवाड व वर्षाराणी पाटील यांच्या पुढाकाराने तेलवे, नणुद्रे, घोटवडे, उंड्री व निवडे या गावांमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच प्रत्येक गावात उमेदवारांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. स्थानिक प्रश्न, विकासकामांची दिशा तसेच महिलांसाठीच्या विविध योजनांबाबत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. या प्रचारामुळे कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघात शिंदे सेनेच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


