हूबळी येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूर च्या ऋषिकेश कबनुरकर उपविजेता

0
15

प्रतिनिधि: प्रमोद पाटील

कोल्हापूर : हूबळी ( कर्नाटक)के ल ई टेक्निकल कॉलेज येथे २५ आणि २६ जानेवारी रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे प्रजासत्ताक चषक रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनुरकर याने ९ व्या फेरीत ८ गुण मिळवून दूसरा क्रमांक घेत ३०००० रुपये आणि चषक पटकविला. १८ फिडे मानांकन गुण कमाई केली मंदार लाड गोवा याने ८.५ गुण मिळवून हा विजेता झाला याला ४०००० रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले हूबळी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने तर्फे हूबळी येथे खुल्या वर्षांखालील मुलांसाठी फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एकूण ५००००० रुपयाची पारितोषिके होती. देशातील ३१६ खेळाडूनी भाग घेतला.ऋषिकेश कबनुरकर हा अनुज अकॅडमी, दाभोळकर कॉर्नर, ताराबाई पार्क येथे सराव करतो. तो स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याला कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे, सचिव शुभांगी गावडे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन माजी सेक्रेटरी कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here