कोलोली गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; विविध संस्थांमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण

0
7

कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी शोभा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामस्थ, पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचप्रमाणे भैरव विकास संस्था येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त स. म. पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत देशाच्या विकासात संस्थांच्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला.
तसेच विनय कोरे दूध उत्पादक संस्था येथे शुभांगी जाधव (पोलीस पाटील) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी दूध उत्पादक शेतकरी, संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात राष्ट्रभक्तीपर भाषणे व देशप्रेम जागवणारे संदेश देण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये राष्ट्रध्वजाला मानवंदना देत संविधान मूल्ये, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प करण्यात आला. गावात सर्वत्र उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण पाहायला मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here