
कोल्हापूर प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
प्राचार्य डॉ. जे. के. पवार सर यांच्या कन्या श्रीमती राजकुंवर संदीप डफळे यांची महाराष्ट्र शासन, मुंबई येथे अवर सचिव पदावर बढती झाल्याबद्दल श्री राम सहकार समूह, वाशी यांच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
या सत्कारप्रसंगी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. बी. ए. पाटील, संचालक श्री. महादेव पाटील, श्री. विलासराव पाटील तसेच प्राचार्य डॉ. जे. के. पवार सर उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्रीमती डफळे यांच्या प्रशासकीय कारकिर्दीचा गौरव करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या या यशामुळे पवार कुटुंबासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

