3 व 4 फेब्रुवारी रोजी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धेचे आयोजन

0
6

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): राज्यातील सर्व जिल्हा परिषदमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025 परीक्षेचे 3 व 4 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक दिवशी तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने 29 जानेवारी रोजी www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

परीक्षार्थी उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रवेशपत्र डाऊन करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी 1800 222 366/1800 103 4566 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा व https://cgrs.ibps.in/ या लिंकवर तक्रार नोंदवावी. प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्यासाठी आवश्यक लॉगिन आयडी (Registration No.) आवेदनपत्रावर उपलब्ध असून पासवर्ड हा संबंधित उमेदवाराची आवेदनपत्रावरील जन्मतारीख आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी., असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here