
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
उंड्री (ता. पन्हाळा)
यशवंत फाउंडेशन, उंड्री यांची पंचवार्षिक कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यशवंत फाउंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. दिनकर यशवंत यादव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय, उंड्री येथे संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत सर्वानुमते नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
या निवड प्रक्रियेत श्री. दिनकर य. यादव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी श्री. विजय ब. मोरे यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सचिव म्हणून श्री. राजेंद्र श्री. यादव तर खजिनदारपदी श्री. तुकाराम बा. दाते यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणी सदस्य म्हणून
श्री. शहाजी ना. कुदळे,
श्री. आनंदा पं. यादव,
श्री. गणेश शि. कांबळे,
श्री. नंदकुमार ल. नाकार्डे,
श्री. ज्ञानेश्वर वि. सुतार,
श्री. शिवाजी बा. यादव,
श्री. प्रताप आ. पाटील,
श्री. अमित गा. यादव
आणि श्री. श्रीकांत म. मोळे
यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. फाउंडेशनच्या माध्यमातून उंड्री व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येतील, असा विश्वास अध्यक्ष श्री. दिनकर यादव यांनी व्यक्त केला.
नवीन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत असून, यशवंत फाउंडेशनच्या कार्याला नव्या कार्यकारिणीमुळे अधिक बळ मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

