
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
पुणे: पुण्यातील तरुण उद्योजक मयुरेश नाणेकर आणि तुषार जाधव यांनी ‘क्लीनचीट’ या नव्या हेल्दी स्नॅकिंग ब्रँडची सुरुवात केली आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चव आणि पोषण यांचा योग्य समतोल साधणारे स्नॅक्स देण्याचा हा उपक्रम आहे.
क्लीनचीट अंतर्गत व्हे प्रोटीनपासून तयार केलेले, नो अॅडेड शुगर असलेले प्रोटीन वेफर बार्स सादर करण्यात आले आहेत. हे बार्स हॉट चॉकलेट, चोकोमिंट, स्ट्रॉबेरी आणि बर्थडे केक अशा आकर्षक फ्लेवर्समध्ये उपलब्ध असून, चवीला ट्रीटसारखे आणि पोषणमूल्यांनी समृद्ध आहेत.
‘चिट डे’ म्हणजेच आरोग्याशी तडजोड न करता स्नॅकिंग करता यावे, या संकल्पनेवर आधारित क्लीनचीट ब्रँड फिटनेसप्रेमी, नोकरदार वर्ग आणि आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांसाठी तयार करण्यात आला आहे.
क्लीनचीट उत्पादने ब्लिंकिट, अॅमेझॉन तसेच www.cleancheat.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

