
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
कोतोली पंचायत समिती मतदारसंघातील शिंदे सेनेचे उमेदवार आण्णासाहेब बाळकू गायकवाड यांनी तेलवे व नणुंद्रे गावांमध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेत आशिर्वाद मागितले. यावेळी त्यांनी मतदारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.गायकवाड यांनी सांगितले की, कोतोली पंचायत समितीच्या माध्यमातून गावातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. तसेच शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवून त्यांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“धनुष्यबाण या चिन्हाला मतदान करा, मी तुमच्या गावाचा सर्वांगीण विकास करीन,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.दरम्यान, सोनाली आण्णासाहेब गायकवाड यांनी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी त्यांनी महिलांनी आपल्या पतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे भावनिक आवाहन केले.या प्रचारावेळी शिंदे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.


