
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथील वाड्.मय मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत आयोजित करण्यात आलेले पाचवे राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन युवा साहित्य संमेलन पुढे ढकलण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या शोकसंदर्भात सदर साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची सर्व साहित्यप्रेमी, रसिक, श्रोते, विचारवंत तसेच सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात व वाड्.मय मंडळ प्रमुख डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले आहे.
सदर संमेलनाची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

