
कोल्हापूर प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
आर. एल. तावडे फाऊंडेशन संचलित राजेंद्रनगर येथील बड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मेजर सुप्रीत कट्टी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी मेजर सुप्रीत कट्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्तबद्ध जीवनाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थी जीवनात अंगीकारलेली शिस्त भावी आयुष्यात यशासाठी कशी उपयुक्त ठरते, याबाबत त्यांनी आपल्या अनुभवांतून प्रेरणादायी विचार मांडले.‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींनी या गीतावर सुंदर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीतांवर कवायत सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात पासिंग आऊट परेडचे आयोजनही करण्यात आले.या प्रसंगी सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य आदित्य अरविंदेकर, डायरेक्टर बोर्डाचे अनिलकुमार कुलकर्णी, संस्थेच्या संस्थापिका मा. शोभा तावडे, ॲडमिनिस्ट्रेटर प्रतिभा सापळे, शाळेच्या प्राचार्या आशा आनंद यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमासाठी शाळेचा पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. संपूर्ण कार्यक्रम देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.

