
कोतोली प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
मणिपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय शालेय जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत १७ वर्षाखालील ५२ किलो वजन गटात पैलवान नम्रता सुरेश चौगुले हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्यपदक (सिल्वर मेडल) पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.देशभरातील नामवंत आणि कसलेल्या पैलवानांशी सामना करत नम्रताने दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि तांत्रिक ज्युदो प्रेक्षकांची दाद मिळवणारी ठरली. अंतिम फेरीपर्यंत मजल मारत तिने आपल्या मेहनतीचे फळ सिद्ध केले.या यशामागे कोच मधुश्री देसाई मॅडम व प्रज्ञा पाटील मॅडम यांचे मोलाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले.

नम्रतेच्या या यशात तिचे वडील सुरेश बाबुराव चौगुले यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि मार्गदर्शन अत्यंत प्रेरणादायी ठरले.नम्रताच्या या यशामुळे कुटुंबीय, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ती सुवर्णयशाला गवसणी घालेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे.

