केंद्र शाळा पाचगाव येथे उत्साहात ध्वजवंदन व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

0
17

करवीर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
करवीर तालुक्यातील केंद्र शाळा पाचगाव येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त उपसरपंच दिपाली गाडगीळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शाळेत विविध सांस्कृतिक व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. उपसरपंच दिपाली गाडगीळ यांनी आपल्या लहानपणी आलेल्या अडचणी व संघर्षाची कहाणी विद्यार्थ्यांसमोर मांडत मेहनत, चिकाटी आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना विशेष भावले.या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पाचगाव परिसरात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here