
प्रतिनिधी : मेघा पाटील
संस्थेचे संस्थापक, दूरदृष्टी असलेले शिक्षणतज्ज्ञ स्व. डॉ. ए. डी. शिंदे सर यांच्या १६ व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेमध्ये विविध शैक्षणिक व सामाजिक जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सामाजिक जबाबदारी या मूल्यांवर आधारित संस्थेचा पाया घालणाऱ्या डॉ. शिंदे सरांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या निमित्ताने सकाळी “पुष्पांजली” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व मान्यवर, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. डॉ. ए. डी. शिंदे सरांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच या दिवशी डॉ. शिंदे सरांनी आयुष्यभर जोपासलेल्या आदर्श, मूल्ये आणि विचार समाजात पोहोचवण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम, व्याख्याने, कार्यशाळा, सामाजिक जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. उच्च शिक्षणातील गुणवत्ता, नवोपक्रम, शाश्वत विकास आणि सामाजिक बांधिलकी यावर आधारित उपक्रमांद्वारे त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संस्थेचा संकल्प आहे.
स्व. डॉ. ए. डी. शिंदे सरांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे असून त्यांच्या मार्गदर्शनामुळे असंख्य विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक घडले आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन संस्था आजही शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे.
या पुण्यतिथी निमित्त आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन डॉ. शिंदे सरांच्या विचारांना आणि कार्याला उजाळा देण्याचे आवाहन संस्थेच्या संचालक, प्राचार्य व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

