ग्रंथ विक्रेत्यांना ग्रंथोत्सवात सहभागी होण्याबाबत आवाहन

0
8

प्रतिनिधी : जानवी घोगळे

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव 2025 चे आयोजन शनिवार व रविवार, 14 व 15 फेब्रुवारी रोजी श्री इंजुबाईदेवी सांस्कृतिक भवन, गारगोटी (सोनाळी), ता. भुदरगड येथे करण्यात येणार आहे.या ग्रंथोत्सवाच्या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच ग्रंथालयांशी संबंधित सॉफ्टवेअर कंपन्यांचे स्टॉलही लावण्यात येणार आहेत. ग्रंथ प्रदर्शन/विक्री स्टॉलसाठी इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, 2078, आकाशगंगा अपार्टमेंट समोर, राजारामपुरी 11 वी गल्ली, कोल्हापूर येथे लेखी पत्रासह दि. 5 फेब्रुवारीपर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.या ग्रंथोत्सवामध्ये अधिकाधिक प्रकाशक, ग्रंथ विक्रेते तसेच ग्रंथालयांशी संबंधित विकसित सॉफ्टवेअर कंपन्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा ग्रंथोत्सव 2025 च्या सदस्य सचिव अपर्णा वाईकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here