
(प्रतिनिधी : जानवी घोगळे
अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष, अभ्यासू व संवेदनशील युवा नेतृत्व प्रतिक राजेंद्र साळुंखे यांचा ३१ जानेवारी रोजी वाढदिवस साजरा होत आहे. शैक्षणिक व सामाजिक वारसा लाभलेल्या सुसंस्कृत, प्रतिष्ठित साळुंखे राजवंशीय कुटुंबातील हा युवा योद्धा अल्पवयातच समाजकार्याच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे.समाजकार्याची प्रचंड आवड, सर्वसामान्यांच्या अडचणींप्रती असलेली संवेदनशीलता, अन्यायाविरुद्ध निर्भीड भूमिका आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाण्याचा स्वभाव यामुळे प्रतिक साळुंखे हे “आपला माणूस” म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी चळवळीत अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक असून ते सर्वांशी आपुलकीने संवाद साधणारे, नाती जपणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.एम.ए., बी.एड. अशी उच्चशिक्षणाची भक्कम पार्श्वभूमी असलेले प्रतिक दादा गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी निस्वार्थपणे कार्यरत आहेत. मराठा समाज एकत्र यावा, संघटित राहावा यासाठी त्यांनी विविध उपक्रम, आंदोलने व मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आहेत. समाजातील एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर क्षणाचाही विलंब न करता मदतीला धावून जाणे हा त्यांचा स्वभाव त्यांच्या कार्यातून सातत्याने दिसून येतो.श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ज्येष्ठ बंधू, समाजसेवक रामचंद्र ज्ञानोजीराव साळुंखे यांचे ते नातू असून, शैक्षणिक व सामाजिक वारसा त्यांनी प्रभावीपणे पुढे नेला आहे. त्यांच्या सर्वांना आपलेसे करणाऱ्या स्वभावामुळे त्यांनी विद्यार्थी, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांची मने जिंकली आहेत.अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रत्येक आंदोलनात प्रतिक साळुंखे हे अग्रणी राहिले आहेत. त्यांच्या समाजाविषयी असलेल्या तळमळीची, संघटन कौशल्याची दखल घेत मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मराठा समाजाचे नेते वसंतराव मुळीक नाना यांनी एकमताने त्यांची विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केली.सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. उपनगरात बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत यासाठी निवेदन, महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना सिगारेट पाकिटे फुकट वाटणाऱ्या एजंट्सविरोधात कडक कारवाईसाठी पोलिसांकडे मागणी, विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा, मराठा समाजासाठी शैक्षणिक सवलतींचा लाभ मिळावा यासाठी बैठक व मार्गदर्शन शिबिरे, शिक्षण-व्यवसाय-उद्योग मार्गदर्शन मेळावे, मराठा आरक्षणासाठी आंदोलन, गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभ अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.याशिवाय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बससेवा सुरळीत सुरू करण्याची मागणी, विद्यार्थी निवडणुकांमध्ये सहकार्य, ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा, पाणी प्रश्नासाठी आवाज, कोविड काळातील सामाजिक कार्य, महापुराच्या वेळी नागरिकांना मदत, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे आदी उपक्रमांतून त्यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे.समाजातील दुर्बल घटकांसाठी सातत्याने झटणारे, नवा आदर्श युवा पिढीसमोर उभा करणारे नेतृत्व म्हणून प्रतिक राजेंद्र साळुंखे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांचे सामाजिक कार्य असेच अखंड सुरू राहो, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो व आई जगदंबेचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या वतीने प्रतिक राजेंद्र साळुंखे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.सात्विक मोहिते (शिवाजी पेठ)

