
गोकुळ प्रकल्प, शिरगाव येथे जि.प. सदस्यांच्या सत्कारप्रसंगी चेअरमन नविद मुश्रीफ, विश्वास पाटील व इतर मान्यवर.
कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या परिवारातील सदस्यांची जिल्हा परिषद सदस्यपदी निवड ही संपूर्ण गोकुळ परिवारासाठी अभिमानास्पद ठरली आहे. या यशाचा गौरव करत गोकुळतर्फे नूतन जि.प. सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा गोकुळ प्रकल्प, शिरगाव येथे उत्साहात पार पडला.
या प्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अमरसिंह पाटील, अभिजित तायशेटे, सौ. सुयशा अंबरिषसिंह घाटगे (व्हनाळी), कु. अमृता अरुण डोंगळे (घोटवडे), श्री. शिवाजी मुरलीधर जाधव (हुपरी) व श्री. अनिरुद्ध केदारी रेडेकर (पेद्रेवाडी) यांचा गौरव करण्यात आला.
“ गोकुळ ही संस्था नाही, एक सशक्त कुटुंब आहे” – नविद मुश्रीफ
यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले,
“गोकुळ ही केवळ दूध संघटना नसून एक सशक्त, मूल्यनिष्ठ आणि समाजाभिमुख कुटुंब आहे. आपल्या परिवारातील सदस्य विविध क्षेत्रांत यश संपादन करत आहेत, ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. हे यश केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नसून संपूर्ण गोकुळ परिवाराच्या संस्कारांचे फलित आहे.”
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्य करताना ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधा यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. सहकारातून शिकलेली पारदर्शकता, जबाबदारी व जनसामान्यांप्रती संवेदनशीलता सार्वजनिक कार्यात जपली गेली पाहिजे.
“ गोकुळचा सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी” – अमृता डोंगळे
सत्कारास उत्तर देताना कु. अमृता डोंगळे यांनी भावना व्यक्त करत सांगितले,
“गोकुळ परिवाराने दिलेला सन्मान आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. सहकाराची परंपरा आणि समाजाशी असलेली नाळ आम्हाला पुढील कार्यकाळात दिशा देईल. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करू.”
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मानाचा मुजरा
या सोहळ्यात गोकुळमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही विशेष सत्कार करून त्यांच्या दीर्घ व समर्पित सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ. शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले तसेच अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

