ग्रंथदिंडीच्या जल्लोषात साहित्य संमेलन संपन्न; ‘व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास करा’ असा संदेश

0
100

कोल्हापूर प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
उत्साह, साहित्याची आस आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाचे साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. “विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशापुरते मर्यादित न राहता वाचन, लेखन, चिंतन आणि संस्कार यांच्या माध्यमातून व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास साधावा,” असे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या भाषणात केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘विवेक न्यूज’ या सहामाही अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते किरण गुरव यांची रंगतदार प्रकट मुलाखत
संमेलनाच्या प्रथम सत्रात किरण गुरव या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांची विद्यार्थ्यांनी घेतलेली प्रकट मुलाखत विशेष आकर्षण ठरली. गुरव यांनी आपल्या साहित्य प्रवासातील संघर्ष, लेखनातील संवेदनशीलता आणि कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचे अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या विचारांनी तरुणाईला लेखनाची प्रेरणा मिळाली.
युवा कवी संमेलनात कवितांचा वर्षाव
दुसऱ्या सत्रात विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली युवा कवी संमेलन रंगले. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामाजिक, पर्यावरण, प्रेम, राष्ट्रभावना आदी विविध विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. महाविद्यालयातील प्रा. सतीश उपळावीकर, डॉ. कैलास पाटील व डॉ. इरफान मुजावर यांनीही आपल्या काव्यरचना सादर करत वातावरण भारावून टाकले.

ग्रंथदिंडीने झाली दिमाखदार सुरुवात
संमेलनाची सुरुवात डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधी परिसरापासून ग्रंथालयापर्यंत काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने परिसर साहित्यप्रेमाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने व रोपाला पाणी घालून करण्यात आली.
संमेलनाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले. स्वागताध्यक्ष विद्यार्थी प्रतिनिधी कु. श्रावणी पाटील हिने मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. अविनाश गायकवाड व डॉ. एस. एस. अंकुशराव यांनी प्रभावीपणे केले.
व्यापक सहकार्य, उत्स्फूर्त प्रतिसाद
या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. कविता तिवडे, डॉ. दीपक तुपे, डॉ. एस. आर. कट्टीमनी, डॉ. नीता पाटील, श्री. हितेंद्र साळुंखे, डॉ. शुभांगी काळे, प्रा. एच. व्ही. चामे, डॉ. ए. एस. महात, प्रा. अश्विनी खवळे, प्रा. सनी काळे, डॉ. स्नेहा देसाई, प्रा. रोहिणी रेळेकर तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संमेलनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. साहित्य, संस्कार आणि सर्जनशीलतेचा संगम घडविणारे हे संमेलन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला नवी दिशा देणारे ठरले.

संमेलनाची ग्रंथदिंडी ने झाली सुरुवात
डॉ. बापूजी साळुंखे यांच्या समाधी परिसरापासून ग्रंथालयापर्यंत काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात निघालेल्या या दिंडीने परिसर साहित्यप्रेमाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने व रोपाला पाणी घालून करण्यात आली.
संमेलनाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले. स्वागताध्यक्ष विद्यार्थी प्रतिनिधी कु. श्रावणी पाटील हिने मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. अविनाश गायकवाड व डॉ. एस. एस. अंकुशराव यांनी प्रभावीपणे केले.
व्यापक सहकार्य, उत्स्फूर्त प्रतिसाद
या संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. कविता तिवडे, डॉ. दीपक तुपे, डॉ. एस. आर. कट्टीमनी, डॉ. नीता पाटील, श्री. हितेंद्र साळुंखे, डॉ. शुभांगी काळे, प्रा. एच. व्ही. चामे, डॉ. ए. एस. महात, प्रा. अश्विनी खवळे, प्रा. सनी काळे, डॉ. स्नेहा देसाई, प्रा. रोहिणी रेळेकर तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. एस. के. धनवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संमेलनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. साहित्य, संस्कार आणि सर्जनशीलतेचा संगम घडविणारे हे संमेलन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला नवी दिशा देणारे ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here