
जिल्हा परिषद–पंचायत समिती उमेदवारांच्या विजयासाठी महिलांचा निर्धार
पाचगाव (प्रतिनिधी) : पांडुरंग फिरींगे
पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आज लोकनियुक्त सरपंच प्रियांका संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य हळदी-कुंकू कार्यक्रमातून निवडणूक प्रचाराला अभूतपूर्व बळ मिळाले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद उमेदवार संग्राम पाटील व पंचायत समिती उमेदवार सीमा पोवाळकर यांना विजयी करण्याचे एकमुखी आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी उसळली होती. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पाचगाव मतदारसंघात परिवर्तन नव्हे तर विकासालाच पुन्हा संधी देण्याचा ठाम निर्धार स्पष्टपणे दिसून आला. हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेला हा प्रचार जनतेच्या विश्वासाला बळ देणारा ठरला.

या वेळी उपसरपंच दिपाली गाडगीळ, सचिन पाटील, अश्विनी चिले, संजय शिंदे, रोमा नलवडे, प्रविण कुंभार, शांताराम पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे मतदारांशी संवाद साधत उमेदवारांच्या विकासात्मक कामांचा आढावा मांडला.पाचगाव येथे आमदार सतेज पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या माध्यमातून विकासाची गंगा वाहिली आहे. हा विकास अधिक गतिमान करण्यासाठी संग्राम पाटील व सीमा पोवाळकर यांना निवडून देण्याचे आवाहन उपस्थितांनी केले.“गावाचा सर्वांगीण विकास, महिलांचे सक्षमीकरण आणि तरुणांना संधी देणारे नेतृत्वच पाचगावच्या भविष्यासाठी आवश्यक आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. महिलांनी मोठ्या मताधिक्याने उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करत प्रचाराला निर्णायक वळण दिले.या कार्यक्रमामुळे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस आघाडीची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत असून, आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावरच मतदान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

