
मोरेवाडी (प्रतिनिधी) : पांडुरंग फिरींगे
पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार संग्राम गोपाळराव पाटील तसेच उजळाईवाडी पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार डॉ. शिल्पा हजारे यांच्या प्रचाराचा मोरेवाडी येथे मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. प्रचार शुभारंभानिमित्त परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर (घटनेनुसार) शोकसभा आयोजित करून उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या कार्याची आठवण काढण्यात आली.

यानंतर उमेदवारांनी घर टू घर प्रचार करत मतदारसंघातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटी देत आपली भूमिका मांडली. विकासाभिमुख विचारसरणी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, मतदारांनी आशीर्वाद देऊन विजयी करावे, असे आवाहन संग्राम पाटील व डॉ. शिल्पा हजारे यांनी केले.
या प्रचार प्रसंगी उमा पाटील, प्रकाश मोरे, अमर मोरे, बाबुराव भोसले, उत्तम आंबवडे, सरपंच ए. व्ही. कांबळे, ऋषिकेश हुन्नुरे, राजेंद्र मोरे, आशिष पाटील, मानसिंग धनवडे, शिवाली देसाई यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.मोरेवाडी परिसरात झालेल्या या प्रचार दौऱ्यामुळे उमेदवारांच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


