प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत साळुंखे–गावडे–पाटील कुटुंबीयांचा मंगल-सोहळा संपन्न..

0
298

कोल्हापूर (प्रतिनिधी):पांडुरंग फिरंगे

साळुंखे, गावडे आणि पाटील कुटुंबीयांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विवाहसोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात पार पडला. या मंगलप्रसंगी प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, संस्थेचे हितचिंतक, मित्रपरिवारासह कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्यास सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थिती लावत वधू-वरांना शुभेच्छा व आशीर्वाद दिल्याने कार्यक्रमाला विशेष प्रतिष्ठा लाभली. साळुंखे, गावडे व पाटील कुटुंबीयांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे या विवाहसोहळ्यास विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींची उपस्थिती लाभली, हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले.विवाहप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कुटुंबीयांचे अभिनंदन करत नवदांपत्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध व सुसंस्कृत पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थित पाहुण्यांसाठी पारंपरिक आदरातिथ्य व स्नेहपूर्ण स्वागत करण्यात आल्याने सोहळ्याची आठवण उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ राहणारी ठरली.फोटो कॅप्शन :वधू-वरांना आशीर्वाद देताना प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मा. प्रतापसिंह जाधव, मा. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, छत्रपती मालोजीराजे, मा. खासदार निवेदिता माने, मा. संजय डी. पाटील, मा. आमदार प्रकाश आवाडे, मा. खासदार संजय मंडलिक, मा. ऋतुराज पाटील, मा. राजेंद्र खानविलकर, मा. बाळासाहेब कुपेकर आदी मान्यवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here