
प्रतिनिधी : जानवी घोगळे
सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेन्शल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन,कोल्हापूर येथे 4 फेब्रुवारी 2026 रोजी पालक मेळावा घेण्यात आला. प्राचार्य डॉ. आर.जी.कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यां मधील उद्ममशीलतेला वाव देणारे शिक्षण महाविद्यालयात आहे व ते त्यांच्या प्रदर्शनातून सिद्ध होत आहे असे नमूद केले. निलम जिरगे फूड टेक्नॉलॉजी,प्रज्ञा कापडी फॅशन डिझाईन, प्रीती गरगटे इंटेरियर डिझाइन,प्रियांका चव्हाण पर्यावरण शास्त्र ,उमेमसीरा रहिमतपुरे कॉमर्स, विभाग प्रमुखांनी विभागामार्फत घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकांना दिली.पालकांनी शिक्षकांसोबत संवाद साधला. श्वेता शहा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रितिका चंदवाणी यांनी उपस्थितांचे आभार मानले. पालकांनी मेळाव्यास उत्तम प्रतिसाद दिला.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त डॉ.आर.ए.शिंदे व संस्थेचे सचिव सी.ए.ऋषिकेश शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

