मुडशिंगीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती विजय पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश…

0
9

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रमोद पाटील


गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झालेल्या मुडशिंगीच्या माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना विजय पाटील आणि माजी पंचायत समिती सभापती विजय पाटील यांनी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
गडमुडशिंगी आणि गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदार संघातील आपल्या समर्थकांसह पाटील पती-पत्नींनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार अमल महाडिक यांच्या विकासाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.


दोन्ही जिल्हा परिषद मतदार संघामध्ये भाजप उमेदवारांच्या विजयासाठी रात्रीचा दिवस करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.
यावेळी जैन समाजाचे अध्यक्ष चारुदत्त तिपकोंडा पाटील, माजी सरपंच नरसगोंडा सातगोंडा पाटील, जवाहर कारखान्याचे मॅनेजर उत्तम दौलतराव कुंभार, कल्लाप्पाण्णा आवाडे सहकारी बँकेचे संचालक विष्णुपंत कुंभार, शितल भेंडवडे, सनी कोशिंबरे, विजय पाटील रोहित पाटील, आनंदा गुरव, तन्मय पाटील, अण्णासाहेब कुंभोजे, माजी उपसरपंच रोहित पाटील, महावीर व्हसामणी,माजी सरपंच राजगोंडा पाटील, माजी सरपंच सोनबा कोळी, अण्णासो पाटील सावकर, महावीर पाटील चिंचवडकर, महावीर पाटील,अण्णासो पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here