
प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
“गण गण गणात बोते…” या जयघोषात श्री गजानन महाराजांच्या पावन १४८ व्या प्रकटदिनानिमित्त फुलेवाडी परिसरात भक्तिभावाने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. श्रींच्या कृपेने व आशीर्वादाने हा धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आला असून, सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.या निमित्ताने रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महाप्रसाद अमृत लॉन, अमृत मल्टीपर्पज हॉलच्या पाठीमागे, बालिंगा रोड, फुलेवाडी, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे.या भक्तीपूर्ण सोहळ्याचे आयोजन आपले विश्वासू भक्त अतुल बाळासाहेब बोंद्रे व अभिजीत बाळासाहेब बोंद्रे यांनी केले असून, परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गजानन महाराजांच्या नामस्मरणात सहभागी होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

