
प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
येथील कदमवाडी परिसरात श्री गजानन महाराजांच्या १४८ व्या प्रकटदिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता कुंकूमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.हा कुंकूमार्चन सोहळा ४९, ई वॉर्ड, वरद, उत्तम मेडिकल्स शेजारी, कदमवाडी, कोल्हापूर येथे संपन्न होणार असून, महिला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असेही कळविण्यात आले आहे.या दोन्ही कार्यक्रमांचे स्वागतोत्सुक सौ. दिपाली व श्री. सुजित बा. जाधव असून, परिसरातील भाविकांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
मो. ९८२३३ ४४७७०

