
कोल्हापूर प्रतिनिधी : प्रमोद पाटील
एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प करवीर-२
बीट – वडणगे-२ गाव – बालिंगा बटुकेश्वर कॉलनी कोल्हापुर . अं.क्रं. – १४२
,नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर अंगणवाडीतील बालचमू, सर्व पालक,ग्रामस्थ पर्यवेक्षिका सौ. विनया कुलकर्णी मॅडम व अंगणवाडी सेविका – सौ. गायत्री मंगेश सोहनी.मदतनीस – सौ. रोहिणी उमेश कांबळे या कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमास एकूण ३० गाण्यांचे मुलांनी सादरीकरण करत असताना मुलांनी रसिकांची मने जिंकली.मुलांची गाणी व उत्साह पाहून मान्यवर व ग्रामस्थांनी मुलांना कौतुकाची थाप म्हणून रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आली.तसेच अंगणवाडी क्रीडा महोत्सवातील विजेत्या चिमुकल्यांना प्रशस्तीपत्रक व चषक देण्यात आले.श्रीमती विनया कुलकर्णी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने कार्यक्रम अतिशय आनंदात व उत्साहात पार पडला.

