
प्रतिनिधी : जानवी घोगळे
लता मंगेशकर स्मरणार्थ तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
असोसिएटेड पार्टनर – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
कोल्हापूर : कलानगरी कोल्हापूरमध्ये यंदा पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. भगवान सांस्कृतिक क्रियेशन अँड सोशल फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या मुख्य आयोजनाखाली आणि स्मिताश्री स्टुडिओज, मुंबई प्रस्तुत ५ वे कलानगरी कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव – २०२६ आयोजित करण्यात येत आहे. हा तीन दिवसीय महोत्सव भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणार आहे.
या महोत्सवात लघुपट, डॉक्युमेंटरी आणि वेब सिरीज या प्रकारातील कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, “कलाकारांची कलाकारांकडून कलाकारांसाठी” असा हा एकमेव फिल्म फेस्टिव्हल असल्याचा आयोजकांचा दावा आहे.
बक्षिसांची आकर्षक श्रेणी
लघुपट पुरस्कार
- प्रथम लघुपट पारितोषिक
- द्वितीय लघुपट पारितोषिक
- तृतीय लघुपट पारितोषिक
- बेस्ट महिला दिग्दर्शक लघुपट
- बेस्ट सामाजिक विषय लघुपट 🎞 विशेष पुरस्कार
- बेस्ट डॉक्युमेंटरी फिल्म
- बेस्ट वेब सिरीज
वैयक्तिक पुरस्कार (लघुपटासाठी)
१) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
२) सर्वोत्कृष्ट कथालेखन
३) सर्वोत्कृष्ट पटकथा
४) सर्वोत्कृष्ट संवाद
५) सर्वोत्कृष्ट संकलन
६) सर्वोत्कृष्ट कॅमेरामन
७) सर्वोत्कृष्ट संगीत
८) सर्वोत्कृष्ट बालकलाकार
९) सर्वोत्कृष्ट अभिनेता
१०) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
प्रत्येक सहभागी लघुपट, डॉक्युमेंटरी व वेब सिरीजला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व बक्षिसे ट्रॉफी स्वरूपात असतील.
नियम व अटी (संक्षेप)
- लघुपट व वेब सिरीज प्रवेश फी : ₹१००० (नॉन-रिफंडेबल)
- डॉक्युमेंटरी प्रवेश फी : ₹१२०० (नॉन-रिफंडेबल)
- विषय खुला आहे.
- लघुपट कालावधी : १ ते ३० मिनिटे (सबटायटल आवश्यक)
- मराठी, हिंदी, इंग्रजी फिल्मसाठी सबटायटलची गरज नाही.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
- निवड झालेल्याच लघुपटांचे स्क्रिनिंग केले जाईल.
- डॉक्युमेंटरी व वेब सिरीजमधून फक्त बेस्ट पुरस्कार दिला जाईल; त्यांचे स्क्रिनिंग होणार नाही.
- मर्यादित प्रवेश.
महत्त्वाच्या तारखा
- प्रवेश नोंदणी अंतिम तारीख : २५ मार्च २०२६
- महोत्सव व स्क्रिनिंग : १०, ११ व १२ एप्रिल २०२६
- ठिकाण : कोल्हापूर 📩 प्रवेश पाठविण्याची माहिती
लघुपट, डॉक्युमेंटरी व वेब सिरीज एपिसोडची लिंक व HD पोस्टर खालील ईमेलवर पाठवावी:
kkifilmfestival@gmail.com
(लिंकवरील दर्जाबाबत आयोजक जबाबदार राहणार नाहीत.)
संपर्क
मुख्य आयोजक : महादेव साळोखे
९१५६२३१८११
(Google Pay द्वारे फी भरता येईल)
चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांनी या महोत्सवात सहभाग नोंदवून आपल्या कलाकृतींना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

