3 ऑगस्ट 2023 प्रत्येक तुटलेल्या नातेसंबंधांना बलात्काराचा खटला म्हणून लेबल न लावण्याचा इशारा देत लग्नापर्यंत पोहाेचत नाही, ते प्रत्येक नाते बलात्कार नाही, असे मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केले. लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेशी शारीरिक संबंध प्रस्तापित करणाऱ्या एका पुरुषाविरुद्धचा बलात्काराचा खटला रद्द करण्याच्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. वकिलाने युक्तिवाद केला की, पुरुषाने तिच्याशी जवळजवळ पाच वर्षे शारीरिक प्रस्तापित करुन ही लग्नाला नकार दिला. त्यावर, जिथे शारीरिक संबंध दीर्घकाळ चालतात व नातेसंबंध विवाहात संपत नाहीत, त्याला बलात्कार म्हणायचे का? असे होऊ शकत नाही, असे सांगत काेर्टाने महिलेचे अपील फेटाळून लावले आहे.