इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचा जाहीर निषेध

0
106

कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील

क दिवशीय स्मशान समाधी आंदोलन इचलकरंजी महानगरपालिकेच्या आवारात करणार…

इचलकरंजी शहराला ग्रीन सिटी करून देण्याचा मानस महानगरपालिकेने केलेला असून त्यासाठी इचलकरंजी शहरात दहा हजार वृक्ष लावणे व जतन करणे कामी नियोजन आखलेले आहे.
ज्या ठिकाणी वृक्ष लावायचे त्या ठिकाणची सूचना महानगरपालिकेला द्यायचे आहेत. महानगरपालिकेकडे कित्येक मंडळानी तशा जागेमध्ये वृक्षासाठी मागणी केलेली आहे. तरुण मंडळे व इचलकरंजीच्या नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने हिरीरीने भाग घेत असताना दिसत असतानाही. दहा हजार वृक्षांचा मक्ता मंजूर असूनही त्याला आदेश महानगरपालिकेचे आयुक्त देत नाहीत. पावसाळ्याच्या आत ते वृक्ष लावली गेली तर ते चांगल्या पद्धतीने रुजून वृक्ष मोठे होऊ शकतात. आज आम्ही वृक्षप्रेमी यासंदर्भात निवेदन दिलेले आहे. तसेच इचलकरंजी शहरातील वृक्षतोडी चे प्रमाण वाढलेले आहे. या अगोदर ज्यांच्या संदर्भात तक्रारी केलेले आहेत. ती प्रकरणे प्रलंबित असून त्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही.
सदर संदर्भात सुद्धा आयुक्तांना भेटून निवेदन दिले असता. आयुक्तांनी सदर बाबतीची तक्रारीला कोणत्याच समाधानकारक प्रतिक्रिया न देता आम्ही बघून घेऊ..आम्ही बघून घेऊ… अशा पद्धतीचे बेजबाबदारपणाचे उत्तरे. वृक्षप्रेमींना देत असल्याने यासंदर्भात वृक्षप्रेमी नाराज झाले.
आय जी एम हॉस्पिटल समोर समोर वृक्षारोपणासाठी 35 ते 40 खड्डे पडलेली आहेत. गेली दोन वर्षे झाली त्या ठिकाणी वृक्ष जतन होत नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी झाडे लावल्यास पिशवी व्यवस्थित पद्धतीने जतन होतील. अशी सूचना मांडत असताना आयुक्तांनी आय.जी.एम. हॉस्पिटल समोरील जागा सोडून कोणत्याही ठिकाणी सांगा अशा पद्धतीचे
उत्तरे निवेदकांना दिले.
इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याकडून वृक्ष प्रेमींना कोणतेच समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
त्यांच्या निषेधार्थ सतेज फायटर च्या वतीने इचलकरंजी महानगरपालिकेच्या आवारासमोर स्मशान समाधी आंदोलन करणार असल्याचे आम्ही निश्चित ठरवलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here