श्री संतोष आत्माराम कोल्हे यांच्या घरी गजानन महाराज प्रकट दिनसोहळा भक्तिभावात साजरा

0
21

पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथे श्री संतोष आत्माराम कोल्हे यांच्या निवासस्थानी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिनसोहळा अत्यंत भक्तिभाव, उत्साह व धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.
प्रकट दिनानिमित्त सकाळपासूनच श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन, आरती व नामस्मरण करण्यात आले. परिसरात “गण गण गणात बोते” या जयघोषाने वातावरण मंगलमय झाले होते.
या पवित्र दिनाचे औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील व आजूबाजूच्या गावातील असंख्य भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
या धार्मिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोल्हे कुटुंबियांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम शांततामय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here