The Art of Living तर्फे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

0
16

प्रतिनिधी : प्रमोद पाटील

कोल्हापूर : Sri Sri Ravi Shankar यांनी संस्थापित केलेल्या The Art of Living संस्थेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आ मेमोरियल हॉल, गवत मंडई, शाहूपुरी येथे करण्यात आले आहे.

या पवित्र दिनानिमित्त रुद्रपूजा, ध्यान, सत्संग आणि प्रसाद वितरण असा समृद्ध आध्यात्मिक कार्यक्रम होणार आहे. महाशिवरात्री हा आत्मशुद्धी, जागृती आणि सकारात्मक उर्जेचा उत्सव मानला जातो. या दिवशी केलेली उपासना आणि साधना मन, बुद्धी आणि चित्त शुद्ध करण्यास सहाय्यभूत ठरते.

रुद्रपूजेसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्वामी निर्मयानंदजी यांची उपस्थिती लाभणार असून रुद्रपूजा वेद विज्ञान पंडित अमितजी यांच्या मंत्रोच्चारांतून संपन्न होणार आहे. वैदिक मंत्रांच्या स्पंदनांमुळे वातावरणातील नकारात्मकता आणि अशुद्धी कमी होण्यास मदत होते, असा विश्वास व्यक्त केला जातो. विशेषतः रुद्र पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन सहभागी भाविकांना गहन ध्यानाचा अनुभव मिळतो.

कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून इच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक शांती व आनंदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here