कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पुरस्कार जाहीर

0
16

प्रतिनिधी : प्रमोद पाटील


कोल्हापूर चैंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही कोल्हापूर जिल्ह‌यातील व्यापारी, उद्‌योजक व व्यावसायीक यांची प्रातिनिधीक शिखर संघटना असून गेल्या ४२ वर्षांपासून व्यापारी, उद्‌योजक व व्यावसायीक यांच्या प्रगतीसाठी व त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी महत्वपूर्ण कार्य करीत आहे.

उद्‌द्योग व व्यापार क्षेत्रातील मान्यवरांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी व शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या व्यापारी उ‌द्योजकांना गौरवण्याची परंपरा २०१८ सालापासून सुरु आहे. त्याप्रमाणे कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार- कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष कै. शिवाजीराव देसाई यांचे कार्य व माहीती होणे तसेच चेंबरची स्थापना करुन व्यापार/उ‌द्योगाला न्याय दिला याचे स्मरण होणेसाठी हा पुरस्कार दिला जातो. कै. परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्‌द्योग पुरस्कार- कोणतेही अभियांत्रिकेचे शिक्षण नाही. पण स्वतःच्या आत्मशक्तीवर उ‌द्योग क्षेत्रातील इंजिनिअरांना लाजवेल अशा पध्दतीने काम करणारे व स्वतःचा उद्‌द्योग क्षेत्रात ठसा उमटविणारे. त्यांची प्रेरणा उ‌द्योग जगताला मिळावी यासाठी हा पुरस्कार दिला जातो. कै. वर्धीमाई परीख व्यापार पुरस्कार- कोणतीही व्यापारी पार्श्वभुमी नसताना सचोटीने व्यापार करून सर्व क्षेत्रात प्रगती करणारे तसेच व्यापाराबरोबर मनोभावे समाजसेवा केल्याबद्दल त्यांच्या नांवे हा पुरस्कार दिला जातो. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष कै. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या स्मृती जतन करणेसाठी सन २०२२ पासून कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार उ‌द्योग पुरस्कार चेंबरचे उपाध्यक्ष असतानाच आमदार पदी निवडून आले. नवीन व्यापारी व उ‌द्योजक तयार व्हावेत अशी इच्छा होती व त्या पध्दतीने काम सुरु होते. पण काळाने घाला घातल्याने त्यांचे स्वप्न अपुरे राहीले. त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणेसाठी व त्यांच्या स्मृती जतन करणेसाठी त्यांच्या नांवे पुरस्कार दिला जातो.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे पुरस्कार प्राप्त मान्यवर

१) कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार- श्री. सुनित चिनुभाई परीख (असोसिएटेड डिझायनर्स व सूरज गॅस एजन्सीज) २)

कै. परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उ‌द्योग पुरस्कार- श्रीमती नलिनी व्ही नेने (मेटाफोर सिन्थेसिस)

३) कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार श्री. विवेक शिवरुद्र शेटे (मे. विवेक शिवरुद्र शेटे) ४)

कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार – उ‌द्योग पुरस्कार-

१) श्री. दुर्गेश बळवंत तोडकर (डीटी असोसिएटस)

२) श्री. प्रताप भगवान पाटील (वॉलस्टार टेक्नॉलॉजीज प्रा. लि.)

तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदी निवड झालेबद्दल रुपाराणी संग्रामसिंह निकम आि कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीत कोल्हापूर चेंबरचे सभासद असलेले नूतन नगरसेवक सत्यजित जाधव, अज् माने, शारंगधर देशमुख, प्रवीण सोनवणे यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.

कोल्हापूर चैंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २० रोजी दुपारी ४.०० वाजता, गोविंदराव टेंबे रंगमंदिर, गायन समाज देवल क्लब, खासबाग, कोल्हापूर येथे आयोजि केला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली चे सेक्रे जनरल खासदार. प्रवीण खंडेलवाल है उपस्थित राहणार असून राष्ट्रीय व्यापार उ‌द्योग धोरण, आव्हाने व संधी विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी श्री. रवींद्र माणगावे अध्यक्ष महाराष्ट्र चैंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबई, श्रीमती जयश्री जाधव- माजी आमदार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ, व श्री. धैर्यशील पाटील- अध्यक्ष दि ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन व दि महाराष्ट्र कन्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कार निवड समितीने निवडलेल्या खालील उद्‌द्योग व व्यापार क्षेत्रातील नामवंताना पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

१) कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार- श्री. सुनित चिनुभाई परीख (असोसिएटेड

बी.ई. सिव्हील, एम.ई. (स्ट्रक्चरल) असणारे सुनित परीख है गेले ४० वर्षे स्ट्रक्चरल कन्स्लटंट म्हणून कार्यरत आहेत. एका हाताने दिव्यांग असून देखील शेकडो बिल्डिंग्ज, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, फ्लॅट सिस्टीम च्या स्ट्रक्चरल डिझाईनचे काम त्यांनी पाहिले आहे. त्याचबरोबर इचलकरंजी येथील सूरज गॅस एजन्सीज या नावाने भारत गॅस चे वितरक म्हणून गेले ३५ वर्षे गॅस सिलेंडर वितरणाचा व्यवसाय करत आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. चे प्रमुख गॅस वितरक असून २०००० घरगुती व १००० च्या वर औ‌द्योगिक आणि व्यावसायिक युनिटस् ना वेळेवर गॅस सिलेंडरचा पुरवठा करत असल्याने कंपनीने त्यांना ४ वेळा सर्वोत्कृष्ट गॅस वितरक म्हणून गौरविले आहे. पश्चिम महाराष्ट्रात औ‌द्योगिक व व व्यावसायिक सिलैंडर्सच्या विक्रीत ते गेली २० वर्षे सलग प्रथम क्रमांकावर अग्रेसर आहेत. त्यांनी औ‌द्योगिक ग्राहकांना डिझेल ऐवजी गॅसची यंत्रणा बसवून मोठ्या प्रमाणात त्यांच्या इंधन खर्चात बचत करुन दिली आहे. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून रुजु झाल्यानंतर वि‌द्यार्थ्यांना ५ वर्षे उच्च शिक्षणाचे धडे दिले. या कालावधीत अनेक अभियंते त्यांनी घडविले. सध्याचा शिवाजी विद्यापीठाचा पदवीधर समारंभाचा हॉल त्यांच्या देखरेखीखाली उभा राहीला. गॅस एजन्सी, स्ट्रक्चरल कन्स्लटन्सी व व्यवसाय सांभाळत त्यांनी समाजकार्यात व सेवाकार्यात सतत हातभार लावला असल्याने त्यांन कै. शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

२) कै. परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उ‌द्योग पुरस्कार श्रीमती नलिनी व्ही. नेने (मेटाफोर सिन्थेसिस)

मेटलर्जी इंजिनिअरिंग मधील पुणे विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर होण्याचा मान मिळाल मे. यशवंत आयर्न अॅड स्टील वर्क्स लि. येथे २५ वर्षांहून अधिक काळ फाउंड्री मॅनेजर म्हणून काम केले. १९ मध्ये मेटाफोर सिन्थेसीस या कंपनीत भागीदारी स्वीकारली. या कंपनीच्या माध्यमातून आयर्न फौंड्री क्षेत्राच कामाचा दर्जा वाढविण्यासाठी भरीव कार्य केले आहे. अभियंते आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करणाऱ्या प्रशिक्ष शिबिरांचे त्यांनी आयोजन केले आहे. फाउंड्री तंत्रज्ञानातील विविध घटक या विषयावर त्यांनी ४ पुस्तके लिहि आहेत. मराठी विश्वकोशासाठी त्यांनी २५ तांत्रिक नोंदी लिहिल्या आहेत. फाउंड्री उद्‌द्योगात केलेल्या सेवेबद्दल त्व पॅको पॉवर ट्रस्ट चा पॅको पुरस्कार, लायन्स क्लब, सोलापूरचा गुणवंत अभियंता पुरस्कार, कोल्हापूर इंजिनिअ असोसिएशनचा उद्‌द्योगश्री पुरस्कार प्राप्त झाले आहेत. वयाच्या ८० व्या वर्षीही त्या सक्रिय आहेत. कोल्हापूर कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने त्यांना कै. परशुराम उर्फ बापूसाहेब जाधव उ‌द्योग पुरस्काराने सन्मानीत करण येणार आहे.

१) कै. वधर्धीमाई परीख व्यापार पुरस्कार श्री. विवेक शिवरुद्र शेटे (मे. विवेक शिवरुद्र शेटे)

१९८३ मध्ये शाहू मार्केट यार्ड येथे अन्नधान्याच्या व्यवसायामध्ये कार्यारंभ केला. उत्तम दर्जा आणि तत्पर सेवा या लत्वाने व्यापार कोकणापासून गोव्या पर्यंत नेला. मे. विवेक शिवरुद्र शेटे, मे. शिवाजीराव शेटे अॅड सन्स, से. विनायक ट्रेडर्स, शिवपुष्प कोल्ड स्टोरेज अशा विविध उ‌द्योगांच्या माध्यमातून कोल्हापूर उद्‌द्योग जगताच्या नावाला आकाशउंची प्रदान केली. कणेरी मठ येथे २०१५ साली आलेला राष्ट्रीय सोहळा भारतीय संस्कृती उत्सव व २०२३ मध्ये झालेला पंचमहाभूते उत्सव या दोन्ही उत्सवामध्ये अन्नदान केले. आपत्तीग्रस्तांना अन्नदान, धनदान आणि वस्त्रदान केले आहे. कोविड काळात केलेल्या रुग्णसेवेप्रत त्यांना आरोग्यमित्र म्हणून गौरविले आहे. गोवा केरी येथील शंकरनाथ महाराज आश्रमास केलेल्या मदतीबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. एलबीटी विरोधातील लढ्‌यात अग्रेसर सहभाग होता. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना कोल्हापूर चैंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

४)

१) श्री. दुर्गेश बळवंत तोडकर (डीटी असोसिएटस्)

कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार उ‌द्योग पुरस्कार-

शालेय शिक्षण घेत असतानाच पुढे जाऊन व्यवसाय करण्याचा ध्यास घेतला. २००० साली दहावीची परीक्षा दिल्यानंतर मिळालेल्या सुट्टीचा उपयोग काहीतरी नवीन शिकून त्याचा आपल्या करीअरला उपयोग होईल यादृष्टीने वाटचालीस सुरुवात केली. भाऊर्जीचा सॉ मिल चा व्यवसाय होता. त्याअनुषंगाने आपण लाकडी फर्निचर क्षेत्रामध्ये काहीतरी काम करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. बी.कॉम झाल्यानंतर व्यवसायाच्या निगडीत इंटिरिअर डिझाईन डेकोरेशनचा डिप्लोमा पूर्ण केला. व्यवसायाच्या अनुभवासाठी २ वर्षे पुणे येथे नोकरी केली. २०१२ साली स्वतःचा व्यवसाय करण्याच्या उद्देशाने कोल्हापूरात आल्यानंतर कोल्हापूर येथील न्याय संकुल कामानिमित्त त्यांना एक चांगली संधी प्राप्त झाली. त्या संधीतूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. नागाळा पार्क येथे स्वतःचे कार्यालय सुरु करुन शासकीय व खाजगी कामे करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्यांनी पुणे आणि नागपूर विमानतळ, कोल्हापूर व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक, यशवंतराव चव्हाण मुक्त वि‌द्यापीठ, नाशिक आणि कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर जीएसटी कार्यालय, कागल नगरपालिका आणि महाराष्ट्रात अनेक महानगरांमध्ये सुरु होत असलेली वैद्यकीय महाविद्यालये येथील इंटेरिअर डिझाईनची कामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार-उ‌द्योग पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

२) श्री. प्रताप भगवान पाटील (वॉलस्टार टेक्नॉलॉजीज प्रा. लि.)

वाशी (जि. सांगली) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबांतील असूनही त्यांनी केवळ १० वर्षात ९ कंपन्यांचा बलाढ्य समूह उभा केला आहे. शुन्यातून सुरुवात करुन आज त्यांनी ८५० हून अधिक कर्मचाऱ्यांना रोजगार दिल्ल आहे. श्री. पाटील यांनी व्यवसायाचा विस्तार केवळ कोल्हापूर किंवा भागापुरता मर्यादित न ठेवता जागति बाजारपेठेत आपले आगळे स्थान निर्माण केले आहे. तोट्‌यातील युनिटस् ना नफ्यात आणणे, सामान्य कर्मचाऱ्यां ‘बिझनेस पार्टनर’ बनवणे आणि कोल्हापूरातून थेट अमेरिका व ऑस्ट्रेलियामध्ये स्वतःच्या कंपन्या स्थापन करणे त्यांच्या नेतृत्वाचे वेगळेपण आहे. ग्रामीण भागातील वि‌द्यार्थी डिजिटल युगात मागे पडू नयेत यासाठी त्यानी
स्वतःहून पुढाकार घेत अनेक जिल्हा परिषद आणि ग्रामीण शाळांना डिजिटल स्क्रिन भेट दिल्या आहेत. अनेक व्यावसायिक स्पर्धेपोटी आपल्या यशाची गुपिते लपवून ठेवतात. मात्र श्री. विश्वास ठेवतात. अनेक नवउ‌द्योजकांना (Startups) आणि पाटील है Open Knowledge Sharing वर रेडिओ सिटीचा एक्सलन्स इन आयटी करतात त्यांना सकाळ माध्यम समूहाचा ब्रेड ऑफ कोल्हापूर २०२२ २०२३ पुरस्कार मिळाला आहे. त्यांना के. आमदार चंद्रकांत जाधव व व्यापार उद्‌योग पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण समारंभ व्यापारी, उद्‌योजक व व्यावसायीकांना प्रोत्साहीत करणारा आहे. तरी सर्व सामासद, व्यापारी उद्‌योजक व नागरिकांनी पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित रहावे अशी विनंती करीत आहोत

पत्रकार परिषदेस कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष राजू पाटील भरत ओसवाल, माजी अध्यक्ष आनंद माने, माजू‌द सचिव वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, संचालक संपत पाटील, राहुल आदी उपस्थित होते. अभित कोठारी, धनंजय दुग्गे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here