कोतोली ग्रामपंचायतीत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन; शिवजयंतीचा उत्साह पंचक्रोशीत दुमदुमला

0
174

कोतोली : प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोतोली ग्रामपंचायत परिसर देशभक्तीच्या घोषणांनी आणि शिवमय वातावरणाने दुमदुमून गेला. लोकनियुक्त सरपंच वनिता पाटील यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
“जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर भारावून गेला आणि उपस्थितांच्या मनात अभिमानाची भावना दाटून आली.

यावेळी उपसरपंच अजित पाटील, महाराष्ट्र उद्योग समूहाचे संचालक सुभाष पाटील, हनुमान उद्योग समूहाचे संचालक प्रशांत पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अरुण पाटील, आदिलशहा मुल्ला, आनंदा आंगटेकर, संतोष पोवार, सागर लव्हटे, सुरेखा कांबळे, रविंद्र सावत, गणेश पाटील, सागर पाटील तसेच ग्रामविकास अधिकारी आर. जे. वळवी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पंचक्रोशीत शिवमय वातावरणकेवळ कोतोलीच नव्हे तर कणेरी, माळवाडी, नणुंद्रे, घोटवडे, उंड्री, बोरगाव, निवडे आदी गावांमध्येही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावागावांत प्रतिमापूजन, अभिवादन, घोषणाबाजी आणि शिवचरित्राचे स्मरण यामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

शिवरायांचे कार्य, त्यांची लोककल्याणकारी शासनव्यवस्था, स्त्रीसन्मान व स्वाभिमानाचा संदेश याची उजळणी करत उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.
शिवजयंतीचा हा सोहळा केवळ औपचारिक न राहता, स्वराज्याच्या मूल्यांची आठवण करून देणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here