
कोतोली प्रतिनिधी :पांडुरंग फिरींगे
उंड्री (ता. पन्हाळा) :
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उंड्री येथे विश्वकर्मा तालीम मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी डॉ. स्वाती पाटील यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील (घुंगुरकर) होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विश्वकर्मा तालीम मंडळाचा आदर्श परिसरातील इतर तरुण मंडळांनी घ्यावा, असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमास के. एस. अण्णा (माजी बांधकाम सभापती), डॉ. अजय चौगुले (महाराष्ट्र प्रदेश सदस्य), महेश जाधव (नाना), संतोष कणसे, सुरेश बेनाडे (भाजपा माजी तालुकाध्यक्ष), प्रकाश देशमुख (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष), आनंदा अंगठेकर (ओबीसी जिल्हा कार्यकारी सरचिटणीस), निलेश सुतार (अध्यक्ष), अनिकेत सुतार (उपाध्यक्ष), युवराज सुतार (शिवसेना युवा नेता) यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

