शिवाई गुपच्या वतीने शिवजयंती निमित्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिववंदना सादर.

0
10

प्रतिनिधी : प्रमोद पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या शिवजयंती सोहळयात शुक्रवार पेठ उत्तरेश्वर पेठ येथील ५१ बाल मावळ्यांनी सौ. यशश्री किशोर घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिववंदना पारंपारिक वेशभुषेत सादर केली. यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज, महापौर रूपराणी निकम, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे (उ. वा. ठा) विजय देवणे, शिवसेनेचे किशोर घाटगे, नगरसेवक आदिल फरास, निलांबरी साळोखे, राजेश लाटकर, अश्किन आजरेकर, उदय शिंदे आदि प्रमुख उपस्थित होते. तर यामध्ये अनय जाधव, विधी जाधव, शमिष्ठा घाटगे, स्वानंदी घाटगे, हर्षवर्धन घाटगे, शिवतेज घाटगे, रणवीर घाटगे, विरांत घाटगे, नरेश बुचडे, देवांश बुचडे, ओमकार घाटगे, केतकी साळोखे, कृष्णाली ओतारी, प्रांजल पाटील, शार्विल पाटील, आदित्य प्रभावळे, वैभवी घाटगे आदिंनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here