कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : एकवेळ विद्यार्थ्यांना पुन्हा शिकवावे लागले तरी चालेल. परंतू त्यांचे खोटे मूल्यमापन करू नका असे आवाहन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या दोन वर्षांच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची प्रमुख उपस्थित होती.
केसरकर म्हणाले, प्राथमिक शिक्षकांचे जे जे प्रश्न आहेत ते ते मार्गी लावण्यासाठी गेल्या वर्षभरात प्रयत्न केले आहेत. आता सातव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कमही लवकरच मिळेल. हे सर्व होत असताना तुम्ही मात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबध्द रहा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शैक्षणिक पध्दतीच्या गुलामगिरीतून सर्वांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतल्याने विविध शाखांचे शिक्षण आता मातृभाषेतून उपलब्ध होणार आहे