मुंबईतून सलग २२ तास प्रवास; २१ फुटी गणेशमूर्तीचे मिरवणुकीने कोल्हापुरात जल्लोषी स्वागत

0
87

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : वाय. पी. पोवारनगर मित्र मंडळ, इंडियन फ्रेंडस् सर्कल, एस पी बॉईज पाठोपाठ रविवारी सायंकाळी जुना बुधवार तालीम मंडळाच्या २१ फुटी गणेशमूर्तीचे जल्लोषात आगमन झाले .

या तालमीने मुंबईत तेजोकायचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेशमूर्तीची प्रतिकृती आहे. परेल (मुंबई) मधून ही गणेशमूर्ती बनवून घेतली आहे. मुंबईतून सलग २२ तास प्रवास करून तालमीने ही गणेशमूर्ती कोल्हापुरात आणली आहे.

बिनखांबी गणेश मंदिर येथून गणेश मूर्तीच्या आगमन मिरवणूकीला प्रारंभ केला. आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्नी जाधव, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना (ठाकरे गट) संजय पवार, युवा नेते कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते मिरवणूकीचे उद्घाटन करण्यात आले. शाहू गर्जनाचे ढोल-ताशा पथक हलगी घुमके, साऊंड सिस्टीम दाखल केली.

ढोल ताशा पथकाने मिरवणुकीत तालबद्ध ठेका धरत मिरवणूक चैतन्य निर्माण केले. तालमीच्या गणेश भक्तांनीही साऊंड सिस्टिममधून वाजत राहिलेल्या गाण्यांवर थिरकत मोरया गजर केला.

ही मिरवणूक महाद्वार चौक, पापाची तिकटी, बुरुड गल्ली, भगतसिंग तरुण मंडळ या मार्गावरून जुना बुधवार तालीम येथे विसर्जित झाली. यानंतर गणेश मूर्ती भव्य मंडपात विधिपूर्वक विराजमान झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here