कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
ओतूर : जुन्नर तालुक्यातील अहीनवेवाडी सारणी येथील लक्ष्मण दत्तात्रय डुंबरे (वय ७१) हे आपल्या मुलगा प्रविण डुंबरे यांचे समवेत मोटार सायकल वरुन घरी जात असताना अचानक ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास जखमी केले ही माहीती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी ओतुर वैभव काकडे,वनपाल सुधाकर गिते,वनरक्षक विश्वनाथ बेले, साहेबराव पारधी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र ओतुर येथे नेऊन उपचार करुन पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नारायणगाव येथे नेण्यात आले त्या कामी रेस्क्यूटीम मेंबर मंदार अहीनवे,विजय वायाळ यानी सहकार्य केले.
सारणी परीसरात पिंजरा लावला असून अजून एक पिंजरा लावण्यात येणार आहे.
अहीनवेवाडी व परिसर बिबट प्रवन क्षेत्र असुन ग्रामस्थ यानी घरासमोर लाईट लावावी, एकटे बाहेर फिरुन नये, बरोबर बॅटरी असावी मोबाईल वरील गाणी वाजवावी,पशुधन बंदिस्त गोठ्यात बांधावे असे वनविभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
तर ओतूर येथील ब्राम्हणवाडा रोड लगत असलेल्या तांबेमळा रोड जवळील ओम साई सोसायटीत पंकज भाटे यांचे रो हाऊसचे समोर पार्किंग एरीया मध्ये बुधवारी बिबट्याने रात्री ३.१५ दरम्यान कुत्र्यावर हल्ला करून पकडुन नेताना सिसीटिव्ही मध्ये कैद झाले आहे.
याआधी येथून २ वेळा या भागातून दोन कुत्र्यांची शिकार केलेली आहे असे स्थानिक रहिवाशांकडून समजते गावातील भरवसतीत हा बिबट्या नेहमी येत असतो. तरी या घटनेमुळे नागरीकांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
तरी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी स्थानिक रहिवाशांकडून मागणी होत आहे ओतूर ग्रामपंचायताने भटकया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा जेणे करून भक्षाच्या शोधात बिबटया गावातील सोसायट्यांमध्ये येणार नाही अशी मागणी नागरिक करत आहेत.