कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
सातारा : पोलिस केसची धमकी आणि पैशाच्या मागणीतून एकाने आत्महत्या केल्याप्रकरणी कारंडवाडीच्या तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये उपसरपंचाचाही समावेश आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सचिन देवीदास कांबळे (रा. खेड, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे.
या तक्रारीनंतर विकास नथू साळुंखे, गणेश शंकर साळुंखे, आणि जीवन बाळासो माने (सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. यामधील विकास साळुंखे हे कारंडवाडीचे उपसरपंच आहेत.
यामधील तक्रारदार सचिन कांबळे यांचे बंधू सूरज कांबळे यांनी आत्महत्या केली होती. तर तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांनी पोलिस केस करण्याची धमकी देऊन आणि पैशाची मागणी करुन मानसिक त्रास दिला. यातून बंधू सूरज यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.
सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक माने हे तपास करीत आहेत.