प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
मुंबई : बांधकाम कामगाराना सोईच्या असणारी मेडीक्लेम योजना व गृहनिर्माण योजना राबवणार असल्याचे आश्वासन कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी लाल बावटा बांधकाम कामगार फेडरेशन (सिटु) च्या शिष्टमंडळाला दिले.
मंत्रालयातील ७ व्या मजल्यावर संघटनेसोबत आयोजित केलेल्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सिटु सलग्न राज्य फेडरेशनने दि ११ सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या निवासस्थानावर मोर्चा आयोजन केला होता. त्या अनुषंगाने मंत्रालयामध्ये काल (१३ सप्टेंबर)रोजी बांधकाम फेडरेशन (सिटु) चे प्रमुख पदाधिकारी व कामगार विभागाचे सर्व सचिव यांची संयुक्त बैठक मंत्रालयामध्ये आयोजित केली होती.
या बैठकीमध्ये, ७ ऑगस्ट २०२३ रोजी तपासणी ते उपचार असे परीपत्रक काढण्यात आले होते, त्यामध्ये बहुतांशी जाचक अटी होत्या त्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर,या योजनेतील परीपत्रकामध्ये दुरूस्ती करून कामगारांना सहज उपचार घेता येतील अशी दुरूस्ती करणार तसेच या योजनेत आई वडीलाच्यावर ही मोफत उपचार करण्यात येणार.
तसेच कामगाराला हॉस्पिटल व सर्व तपासण्यांची साठी लॅब ची सुविधा प्रत्येक जिल्ह्यात रुग्णवाहिका , व उपचार काळातील वेतन देणार असल्याचे आश्वासन दिले.
कामगारांचे अर्ज तपसाल्यानतंर अर्जात तृटी असल्यास सदर तृटी ७ दिवसात पूर्ण करावी लागत होती. त्यामध्ये सुधारणा करून तो कालावधी २१ दिवस करण्याचा निर्णय झाला. बोगस नोंदणी रोखण्यासाठी सर्व सर्चिग पद्धत बंद करून एजंटगिरीला आळा घालणार.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसह सर्व योजनांच्या लाभाच्या रकमेमध्ये काही वाढ करणार व व घराच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले.
चुकीच्या तृटी काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश मंडळ सचिवांना दिले.
एकच दाखला जोडल्यानतंर कामगारांचे पेंडीग नुतनीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. बांधकाम मंडळासाठी मनुष्यबळ अधिकारी व मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता लवकरच 180 अधिकारी कर्मचारी नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
नाका कामगारांना हजेरी कार्ड देऊन हजेरी कार्डावर 90 दिवसाचे काम केल्याचे दिसून आल्यास नोंदणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले व ही पद्धत संपूर्ण महाराष्ट्रावर लागू करणार असल्याचे सांगितले.
ग्रेस पिरियड मधील म्हणजेच नोंदणी किंवा नूतनीकरणासाठी अर्ज दिल्यानंतर मंडळाकडून नोंदणी नूतनीकरण न झालेल्या अर्जदाराचे मयत झाल्यास नैसर्गिक मृत्यू व अपघाती मृत्यू लाभ देण्याचे मंत्री महोदयांनी मान्य केले.
जास्तीत जास्त बांधकाम मजुराची नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळाले. त्यासाठी नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचेही सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.
कल्याणकारी मंडळ सल्लागार मंडळ व तज्ञ समितीवर कामगार प्रतिनिधी, मालक प्रतिनिधी, आस्थापना प्रतिनिधी, नियुक्त करण्याबद्दल सकारात्मक निर्णय करू व कामगार संघटनांचे प्रतिनिधी त्यावर घेण्यात येतील असेही आश्वासन त्यांनी दिले.
या मिटींगमधे बांधकाम कामगारांच्या वतीने डॉ डी एल कराड (सिटु राष्ट्रीय उपाध्यक्ष) , कॉ एम एच शेख (राज्य जनरल सेक्रेटरी सिटु), आ. विनोद निकोले, कॉ के. आर. रघु, कॉ भरमा कांबळे (राज जनरल सेक्रेटरी, बांधकाम फेडरेशन),यांनी बांधकाम कामगारांच्या भूमिका व मागण्या मांडल्या.
या बैठकीला प्रशासकीय अधिकारी सौ. विनीता वेद सिंगल, (प्रधान सचिव कामगार), श्री सतिश देशमुख (कामगार आयुक्त), श्री.दादासाो खताळ (उपसचिव कामगार),
श्री.बाबासाहेब शिंदे (अवर सचिव कामगार),
श्री.विवेक कुंभार (बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सचिव), श्री.शैलेंद्र पोळ (कामगार उपायुक्त पुणे विभाग) आदी उपस्थित होते.
यावेळी संघटनेचे कॉ शिवाजी मगदूम, कॉ प्रकाश कुंभार, कॉ संदीप सुतार, कॉ भगवानराव घोरपडे, कॉ विक्रम खतकर, कॉ आनंदा कराडे, कॉ नुरमहमद बेळकुडे, कॉ हणमंत कोळी, कॉ ओम पुरी, कॉ के नारायण, आदी पदाधिकारी उपस्थित होते.