गणेशमूर्ती सांभाळण्याच्या नादात पाय घसरून मृत्यू; कोल्हापुरातील घटना

0
93

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर – गणेश चतुर्थी असल्याने घरात गणपती बाप्पाला घेऊन येण्यासाठी सचिन सुतार यांनी जय्यत तयारी केली होती. सकाळीच ते गणपती आणण्यासाठी गेले आणि बाप्पांना घेऊन घराकडे निघाले.

घरात जाताना चौकटीला गणपती लागेल म्हणून ते खाली वाकून आत जाण्यास निघाले मात्र याचवेळी त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि जागेवरच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

गणेश चतुर्थी निमित्त कोल्हापूरसह संपूर्ण राज्यातच उत्साहाचे वातावरण होते. प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होती.

मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे याच उत्साहात बाप्पांना घरात आणताना पाय घसरुन पडल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सचिन शिवाजी सुतार (वय ३८ रा. बोलकेवाडी, तालुका आजरा) असे मृत्यू झालेल्या व्यक्ती चे नाव असून या घटनेचे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

गणेश चतुर्थी असल्याने घरात गणपती बाप्पाला घेऊन येण्यासाठी सचिन सुतार यांनी जय्यत तयारी केली होती. सकाळीच ते गणपती आणण्यासाठी गेले आणि बाप्पांना घेऊन घराकडे निघाले.

घरात जाताना चौकटीला गणपती लागेल म्हणून ते खाली वाकून आत जाण्यास निघाले मात्र याचवेळी त्यांचा पाय घसरल्याने ते खाली पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि जागेवरच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

या घटनेने पत्नी व दोन मुलांना मात्र मोठा धक्का बसला. सचिन सुतार हे मूळचे आजरा येथील असले तरी ते उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबई येथे सुतार काम करतात.

गणेशोत्सव असल्याने ते दोन दिवस सुट्टी घेऊन आपल्या गावी परतले होते. मात्र काळाने आक्रित डाव टाकल्याने या दुःखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात कोल्हापूर जिल्ह्यात विविध सार्वजनिक मंडळाकडून गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली. चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच शहरातील अनेक मानाच्या गणपतींनी आगमन मिरवणुका काढून मोठ्या मूर्ती मंडपात प्रतिष्ठापनेसाठी नेल्या.

उत्साही आणि मंगलमय वातावरणात विघ्नहर्ता श्री गणरायाचे सर्वत्र भक्तिमय वातावरणात आगमन झालंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here